नाशिकच्या आकाश शिंदेची राज्य कबड्डी संघात निवड

0
48

नाशिक, प्रतिनिधी – हरयाणा येथे २१ ते २४ जुलै रोजी होणाऱ्या ६९वी राष्ट्रीय वरिष्ठ कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी आज महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला. त्यात नाशिकचा कबड्डीपटू आकाश शिंदे याची निवड झाली आहे.

आकाश हा पंचवटीतील आडगाव इथला रहिवासी असून गेल्या अनेक वर्षापासून तो कबड्डीच्या मैदानात वावरत आहे. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याची गेल्या वर्षी प्रो कबड्डी लीगमध्ये निवड झाली. आकाश पुणेरी पलटण संघाकडून खेळताना त्याच्या शानदार खेळीने सगळेच प्रभावित झाले होते. त्याचाच फायदा त्याने नाशिक संघाला मिळवून देत प्रथमच राज्य कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली होती. तो जिल्हा क्रीडा प्रबोधिनी येथे प्रशिक्षक राम कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

महाराष्ट्राच्या संघात अनुभवी खेळाडू महेंद्र राजपूत आणि सिद्धार्थ देसाई यांची अनुपस्थिती संघासाठी उणीव भासत असली तरी अस्लम इनामदार सारख्या युवा खेळाडूंच्या जोशामुळे त्यांची कमतरता भासणार नाही. ही स्पर्धा हरयाणा येथे होत असून हरयाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, कर्नाटक आदि राज्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आपला सहभाग नोंदवणार आहे.

राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी जाहीर झालेला महाराष्ट्राचा संघ :

अस्लम इनामदार, आकाश शिंदे, मयूर कदम, शंकर गदाई, शेखर तटकरे, सिद्धेश पिंगळे, किरण मगर, देवेंद्र कदम, अक्षय भोईर, राहुल खाटीक, अरकम शेख, अक्षय उगाडे. प्रशिक्षक – प्रशांत चव्हाण.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here