Ajit Pawar NCP | तिसऱ्या महाआघाडीचे नेते बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीतील महाराजांना फोडणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर आज अजित पवारांच्या गटातील आमदाराने महाशक्तीमध्ये प्रवेश केला आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे अजित पवारांनी भाजपच्या जावयाला आपल्या पक्षात घेऊन तिकीट देत विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.
अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले बंड
निवडणूक अगदी तोंडावर आली असताना बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्ती नावाने तिसरी आघाडी तयार केली होती. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी विधानसभेचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला असून यामुळे मोरेगाव जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोरगाव अर्जुनी विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना तिकीट मिळणे अपेक्षित होते. परंतु ऐनवेळी भाजपमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले माजी मंत्री राजकुमार बडोले यांना अजित पवारांनी पक्षप्रवेश देत, उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे सुपुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी सुरुवातीला शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यानंतर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे चाचपणी केली होती. मात्र तिथेही त्यांना विचारात घेतले गेले नसल्यामुळे त्यांनी आता अखेर बच्चू कडू यांच्या तिसऱ्या आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादीला धडा शिकवणार
त्यामुळे मोरेगाव अर्जुनी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. “राष्ट्रवादीत मी निष्ठावंत म्हणून काम केलं आहे. 2014 च्या निवडणूकीत सुद्धा मी तरी सुद्धा मी मतदार संघातून माघार घेतली नव्हती मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर माझे तिकीट कापले गेले. आता या निवडणुकीत मी माझ्या सन्मान कार्यकर्त्यांसोबत ही निवडणूक लढणार असून राष्ट्रवादी पक्षाला आम्ही नक्कीच धडा शिकवणार” असे विधान केले आहे.
चंद्रिकापुरे यांचे अजित पवारांना पत्र?
या पत्रात “नमस्कार मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता बोलतोय आज माझे तिकीट कापण्यात आल्याचे समजले. मुंबईत येऊन देखील रिकाम्या हाताने परत यावे लागले, याचे मनापासून दुःख झाले आहे. दादा तुम्ही जेव्हा महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा इच्छा नसताना देखील आपल्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेवत मी व माझा मतदारसंघ तुमच्या सोबत राहिला. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही माझा विश्वासघात केला. फक्त माझाच नाही तर माझ्यासह माझ्या अर्जुनी मोरेगाव मतदारसंघातील लाखो नागरिकांचा देखील हा विश्वासघात आहे. मीच राष्ट्रवादीचा उमेदवार असेल असे सांगत, मी मतदारसंघातील गावं अन् गाव पिंजून काढली. इथल्या जनतेला आपली भूमिका कशी योग्य आहे, हे समजावले. पण ऐनवेळी माझ्याच पाठीत खंजीर खुपसला गेला.
NCP Ajit Pawar | शिंदेसेने पाठोपाठ अजित पवार गटाची उमेदवार यादी जाहीर
दादा पाठीत खंजीर खुपसल्याचे वाईट तर वाटलेच पण खंजीर खुपसणारा हात आपला होता याचे, जास्त वाईट वाटते. दोन दिवसांपूर्वी भाजपचा नेता प्रफुल्ल पटेल यांना भेटलो आणि त्यांना पटलं हे सहजच पटेल असे नक्कीच वाटत नाही. यात मोठी डील झाली अशी चर्चा आता मतदारसंघातील जनतेत सुरू आहे. कालपर्यंत स्वतःला भाजपचा निष्ठावंत कट्टर नेता म्हणणारा आज सुमडीत आपल्या पक्षात आला. दादा नेतेमंडळी पक्ष बदलायला मोकळी असते, पण सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता एकनिष्ठतेची अग्निपरीक्षा देत असतो. त्यामुळे आपल्या इथल्या नेत्याची बदललेली भूमिका पाहून वाईट वाटले. मतदारसंघातील जनता आहे. कधीही विसरणार नाही हा विश्वासघातकीपणा लक्षात ठेवेल. तुम्हाला कदाचित हे पटले असेल पण माझ्या लोकांना हे पटेल असे नाही. त्यामुळे याच निवडणुकीत याचा हिशोब होणार असून जनताच सुफडासाफ करणार आहे. मी आता जनतेमध्ये जाऊनच दाद मागणार असून जनतेलाच विधानसभेचे तिकीट मागणार आहे.” असे मनोहर चंद्रिकापुरे यांनी या पत्रात म्हटले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम