Maratha reservation | मराठा-ओबीसी वादात अजित दादांची उडी; भुजबळांना समर्थन

0
8

Maratha reservation |  राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा-ओबीसी तसेच मनोज जरांगे आणि छगन भुजबळ(chhagan bhujbal) ही वाद चांगलेच पेटलेले आहेत. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष टोकाला गेला आहे. यासंदर्भात सर्व पक्षीय नेत्यांनी ठराव करुन लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जाहीर केलेली आहे.

पण, त्यानंतर छगन भुजबळ (chhagan bhujbal) विरुद्ध मनोज जरांगे पाटील असा संघर्ष उभा राहिला असून, आता अजित पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात प्रथमच त्यांची रोखठोक भूमिका जाहीर केली आहे. त्यातून त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे कान टोचले आहे. तसेच छगन भुजबळ यांचीच भूमिका पुढे नेत त्यांनी महापुरुषांची उदाहरणे दिली आहेत. अजित पवार  यांनी आपल्या भाषणात कोणाचेही स्पष्टपणे नाव न घेता सर्वकाही बोलून दाखवले आहे.(Maratha reservation)

AAI Recruitment | परीक्षा न देताच एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

काय म्हणाले अजित दादा..? 

जातीचा अभिमान जरु जपावा. पण, इतर जातींच्या संदर्भात मनात द्वेष ठेऊ नका. एखाद्या समाजाचा प्रश्न सोडवत असताना इतरांवर अन्याय होणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. एखाद्या समाजाचे मागासलेपण हे काळानुसार झाले असेल, तर ते तपासण्यासाठी वेळ लागतोच. हे आधी लक्षात घ्या. मराठा समाजाला आरक्षण देताना इम्पेरिकल डाटा हा महत्वाचा आहे. त्याशिवाय आरक्षण टिकणार नाही. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयात ते सिद्ध झाले आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणना ही झालीच पाहिजे.(Maratha reservation)

महापुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र हा आहे का?

राज्यात सध्या जाती जातींमध्ये भांडणे उभी राहिली आहे, हे दुर्देवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगडा जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. पण, आज महाराष्ट्रात हे काय सुरु आहे? त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र हाच आहे का? संपूर्ण देशात आरक्षण हे पहिले महाराष्ट्रात लागू झाले होते.

Nashik Election | हिरे बंधूंसह डोखळे, गुळवे, कुंभार्डे दिग्गजांचे अर्ज झाले बाद

अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण देशात अनेक कामे केलीत. पण, त्या लोकांनी कधीही कुणाची जात बघितली नाही. कुणबी हे शेती करणारे आहेत. आपली पोरं शिकली पाहिजेत. हेच प्रत्येक आई-बापाचं स्वप्न असतं. परंतु इतरांची पोरं शिकू नये, असं नको. आज राज्यात अनेक ठिकाणी चिथावणी करणारे भाषणे होत आहेत. हे थांबलं पाहिजे. यातून जर पुढे दंगली घडल्या तर, कोण जबाबदार? असा नाव न घेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा लगावला आहे.(Maratha reservation)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here