Skip to content

सरकार कोसळणार अजित पवारांच्या ‘या’ निर्णयाने शिक्का मोर्तब


मुंबई; सरकार पडण्याची वेळ आली असून अजित पवारांच्या निर्णयाने आता जवळपास निश्चित झाल्याचे समजत आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले असून त्यांना महाविकास आघाडी नको असल्याची कारणे समोर आली आहेत. यामुळे शिवसेनेला (Shivsena) मोठा झटका बसला आहे. शिवसेनेला (Shivsena) गळती लागली असून एकेक आमदार हे एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होत आहेत तर आज खासदार देखील फुटल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

यातच आता एक मोठी बातमी समजली आहे. राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली शासकीय गाडी (Government vehicle) सोडल्याचे समजते. याचा अर्थ सरकार अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे. ते आपल्या स्वतःच्या गाडीने आता प्रवास करत आहेत असे समजते. तसेच अजित पवारांनी (Ajit Pawar) आपली सुरक्षा व्यवस्थादेखील मागे ठेवली आहे.

आज दिवसभर नाट्यमय घडामोडी घडत असून सध्या शिंदे गटाकडे चाळीस पेक्षा जास्तीचे आमदारांचे संख्याबळ आहे. आज सायंकाळपर्यंत एकनाथ शिंदे त्यांच्या गटाचे पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी याना देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता अजित पवार यांनी शासकीय गाडी सोडण्याचा निर्णय घेतल्याने राज्याचे राजकारण कोणते वळण घेते याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. मात्र अजित पवार यांच्या निर्णयाने सरकारला धक्का मानला जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!