Ahmednagar News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वारे फिरले आणि मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला असून, महायुतीच्या अनेक महत्त्वाच्या जागा हातच्या गेल्या आहेत. यापैकीच एक अनेक वर्षांचा गड भाजपच्या हातून निसटला. राज्याचे महसूल आणि दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांना (Sujay Vikhe) भाजपने दुसऱ्यांदा अहमदनगर दक्षिणमधून निवडणूक लढवली. तर, त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके हे उभे होते.
दरम्यान, या निवणुकीत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांचा दणदणीत पराभाव केला. मात्र, निकाल लागल्यानंतर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात तूफान राडा पहायला मिळाला. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे खासदार निलेश लंके (MP Nilesh lanke) यांच्या समर्थकाला मारहाण करत त्यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. तर, नगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे (Rahul Zhaware) यांच्यावर पारनेर शहरात आठ ते नऊ जणांनी हल्ला करत त्यांना मारहाण केली असून, याता ते जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Ahmednagar News)
Nilesh Lanke | अजित पवारांना मोठा धक्का..!; बड्या नेत्याची घरवापसी
आठ ते नऊ आज्ञातांनी राहुल झावरे यांना मारहाण केली. त्यांची गाडी फोडली. या मारहाणीत राहुल झावरे हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे पारनेर शहरात तणावाचे वातावरण असून, हल्लेखोरांच्या विरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. तर, हा हल्ला नेमका कोणी केला याबाबतही माहिती मिळालेली नाही.
Ahmednagar News | नीलेश लंकेंकडून सुजय विखे यांचा दणदणीत पराभव
अहमदनगर दक्षिण लोकसभेची ही निवडणूकीत (Ahmednagar Lok Sabha Election) सुरुवातीपासूनच मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत होत्या. सुजय विखे यांनी लंकेंवर इंग्रजी भाषेवरून केलेली टिका. मतदानाच्या दिवशी नीलेश लंके यांनी केलेले आरोप. तर, एकीकडे नगरचे विखे घराण्याचे सुजय विखे आणि दुसरीकडे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत उमेदवार असलेले नीलेश लंके यांच्यात ही लढत रंगलेली होती आणि या लढतीत महसूल आणि दुग्ध आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा (Sujay Vikhe) शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जवळपास 29, 317 मतांनी पराभव केला. (Ahmednagar News)
Chandwad – Deola | आहेर समर्थकांचे दावे फोल; चांदवड नाही फक्त देवळा तालुक्यातून ताईंना लीड
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम