Crime News | राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवार रोजी लागला. या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एवढेच नाही तर, अजित पवार यांनी बारामती मधील ३२ पैकी ३० जागांवर घवघवीत यश मिळवले आहे.
या निवडणुकीत मोठ्या पवारांच्या गटाचे अस्तित्व त्यांच्याच राजधानीत कमकुवत दिसले. एकीकडे या निकालाचा जल्लोष सुरु असताना निकालानंतर काही ठिकाणी तूफान राडा आणि गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. इंदापूर तालुक्यातील काझडमध्ये निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे पराभूत उमेदवाराने थेट हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वादातून पत्नीचं भिंतीवर डोकं आपटलं नंतर पती मुलांसह झोपी गेला; सकाळी धक्कादायक बाब समोर
कोणी केला गोळीबार
इंदापूर तालुक्यातील काझड या गावात गोळीबार करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पराभूत उमेदवार राहुल चांगदेव नरुटे व समीर नरुटे यांनी शिवीगाळ करत हवेत गोळीबार केला. याप्रकरणी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरुन राहुल चांगदेव नरुटे व समीर मल्हारी नरुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी दोघांस पोलिसांनी अटक केली आहे.
आणखी एका गावात वाद
बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी या गावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दोन गटांत वाद झाला आहे. याप्रकरणी वडगांव निंबाळकर पोलिसांत ८० ते ९० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदी, शस्त्रबंदीचे आदेश काढले होते. परंतु सायंबाचीवाडी या गावात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या गर्दी जमवून शस्त्र बाळगून राडा करण्यात आला.
Maratha Reservation | जरांगेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची झोप उडाली
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम