Malegaon | अद्वय हिरेंना जामीन नाहीच; कोठडीत आणखी वाढ

0
24
Advay Hiray
Advay Hiray

Malegaon | रेणुका सुत गिरणी कर्ज तसेच फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हीरे यांच्या जामीन अर्जावर काल मालेगाव न्यायालयात सुनावणी झाली होती. पण, न्यायलयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. दरम्यान, अद्वय हिरे यांना ‘जेल की बेल’ याचा निर्णय हा मंगळवारी म्हणजेच आज मालेगाव कोर्ट सुनावणार होतं.

दरम्यान, अद्वय हिरे यांचे वकील आणि जिल्हा बँक तसेच सरकारी वकिलांनी ह्या जामीन अर्जावर दोन तास युक्तिवाद केला होता. दोन्ही युक्तिवाद ऐकून घेत न्यायालय जामीन अर्जावर आज निर्णय देणार होते. दरम्यान, आज मालेगाव न्यायालयाने अद्वय हीरे यांना न्यायालयीन कोठडीतच ठेवण्याचा निर्णय दिला आहे. त्यानुसार डॉ. अद्वय हिरे यांचा जमीन अर्ज फेटाळत त्यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्यात आली आहे.

Nashik | नाशकात एका सेवा निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याची भररस्त्यात भोसकून हत्या

दरम्यान, “काही गोष्टी बेकायदेशीर झाल्या असतील, तर त्याचा कोर्टाने नक्कीच विचार करावा. पण, प्रकरणाची चौकशी ही पूर्ण झालेली आहे. अनेक कागदपत्रे हे हस्तगत करण्यात आलेले आहेत. पोलिसांचे जबाबही झालेले आहेत. कागदपत्रे व प्रॉपर्टी पण शिज केलेल्या आहेत. पुढे आणखी चौकशीचा मुद्दाच शिल्लक राहिलेला नसल्याने अद्वय हिरे यांना न्यायालय व कायद्याच्या चौकटीत राहून नक्की जामीन देईलच असा आशावाद हिरे यांचे वकील ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केला होता.

ही आठ वर्ष जुनी केस

जिल्हा बँकेची ही केस आठ वर्ष जुनी असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया ही सुरुच आहे. सुरुवातीपासूनच आम्ही न्यायालयीन लढाई लढत असून न्यायव्यवस्थेचा आमचा पूर्ण विश्वास असल्याचे डॉ.अपूर्व हिरे यांनी सांगितलं होतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही यापूर्वी अपूर्व हिरे यांनी केलेला होता.

Milk Rate | नाशिक जिल्ह्यातील दूध उत्पादक संकटात; मागणी घटल्याने दर घसरले


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here