अडसरे बु येथे पोषण अभियान सप्ताह अंगणवाडी बिट एक चा उपक्रम

0
14

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अडसरे बुद्रुक खेड बीट क्रं.1 अंतर्गत येथे विविध उपक्रम घेऊन पोषण माह सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे सहाय्यक प्रकल्प अधिकारी वंदना सोनवणे सरपंच संतू नारायण साबळे उप-सरपंच वामण साबळे,कमल तळपाडे ,सुमन आंबेकर इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.

या कार्यक्रमात गरोदर नोंदणी, पौष्टिक आहार प्रदर्क्षण,रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या,तसेच या कार्यक्रमासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महेंद्र दातरंगे यांनी अंगणवाडी शिक्षिका, पालक व मदतणीसा यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगुण परीसरात अंधश्रद्धेविषयी जनजागृती करावी यामुळे भावी पिढी निरोगी व चांगल्या विचारांची घडेल.नवरात्री उत्सवात नऊ रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा विवेकी विचारांचा जागर व्हावा असे त्यांनी सांगितले. अंगणवाडीत “सही पोषण देश रोशन “या बरोबरच विचारांचे पोषण व्हायला पाहिजे. असे सह प्रयोग दातरंगे यांनी सांगितले.

या पोषण माह कार्यक्रमा निमित गावात लेझिम पथकासह वाजत गाजत प्रभात फेरी काढून आरोग्य विषयी घोषणा देवून कुपोषण निर्मुलन झालेच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या .या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका पुर्वा दातरंगे, मंगला जडे, निलम बांबळे, सुखदा पाराशरे, वैशाली सोनवणे, सुप्रिया वाकडे,ज्योती काळे, ललिता चौधरी, अलका खांदवे, ए एन एम माळी, घोरपड़े, ताराबाई परदेशी सुनिता जाधव अनिता गायकवाड, इंदूबाई कुंदे, सिता साबळे, मंगल डोळस, मनिषा कातडे, आशा भालेराव, वर्षा चोथवे, सुनिता साबळे, रिता परदेशी, कविता साबळे, मोनिका साबळे, बसवंता साबळे सह खेड बिट क्रमांक एक मधिल सर्व सेविका व मदतणीस हजर होत्या ईत्यादी उपस्थितीत होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here