Administration | तुकाराम मुंडेंच्या इतक्या बदल्या; यात नेमकी कोणाची चूक..?

0
21

Administration News | देशात काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची सातत्याने बदली होत असते. त्यात तुकाराम मुंढे यांचा पहिला नंबर आहे. २००५ साली आयएएस झालेल्या तुकाराम मुंढे (IAS Tukaram munde) यांची आतापर्यंत १७ ते १८ वेळेस बदली झालेली आहे.

तुकाराम मुंढे हे एक अत्यंत प्रामाणिक आई शिस्तप्रिय अधिकारी आहेत. त्यांच्या समृद्ध सामाजिक जाणिवा, याबाबत कोणालाही शंका असण्याचे कारणच नाही. असे असूनदेखील त्यांची सारखी बदली का होते? याचे उत्तर त्यांच्या स्वभावात तसेच कार्यशैलीतूनच आढळून येते. तुफानी खेळी करण्याच्या नादात आऊट होण्याऐवजी ते राहुल द्रविडसारखे ‘पिच’वर थांबले असते, तर त्यांच्या हातून अनेक ठिकाणी आणि अनेक चांगली कामेदेखील झाली असती.

आपल्या देशाच्या प्रशासकीय यंत्रणेतील ‘आयएएस’ (IAS Tukaram munde)हे सर्वात मोठे पद असून, आयएएस होण्यासाठी अनेकजण रारात्रंदिवस प्रयत्न करत असतात. पण, सर्वांचेच स्वप्न पूर्ण होतेच असे नाही. ह्या पदावर राहून शासकीय योजनांची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे करता येते. तसेच योजनांचा लाभही गरजू लोकांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होते.

Agriculture | सोयाबीनने दिला शेतकऱ्यांना दिलासा; असा आहे दर

लोककल्याणाच्या कामांनादेखील गती देता येते, तसेच अनेक सुधारणाही करता येतात. एकूण काय तर, आयएएस अधिकारी हे प्रशासनाचा ताठ कणाच असतात. सरकार व प्रशासनात समन्वय असणे अपेक्षित असते. आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे लोकप्रतिनिधींना जास्त महत्त्व असते. याचा अर्थ असा नाही की, लोकप्रतिनिधींनी बेकायदेशीर कामे सांगायची व ती सर्व कामे ही अधिकाऱ्यांनी करायचीच. अधिकारी देखील याला स्पष्टपणे नकार देऊ शकतात.

ह्या आयएएस अधिकाऱ्यांना एखाद्या ठिकाणी नियुक्ती मिळाली की, तिथे ते किमान तीन वर्षे काम करू शकतात. त्यानंतरही त्यांना मुदतवाढ देखील मिळू शकते. मग तुकाराम मुंढे (IAS Tukaram munde) यांच्याबाबतीत असे काय झाले आहे की, त्यांनी जितकी वर्षे सेवा केली तितक्याच वेळेस त्यांची बदली देखील झाली ? प्रामाणिक, आणि करड्या शिस्तीचे अधिकारी हे राजकीय नेत्यांना नको असतात. हे मान्य केले तरी सर्वच राजकारण्यांना ते नको असतात? असे म्हणताच येणार नाही.

Political News | ‘महादेवा मला मंत्री करा…’; शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याचं साकडं

मग, मुंढे यांची आतापर्यंत ज्या ज्या वेळी बदली झाली त्या प्रत्येकवेळी लोकप्रतिनिधी, राजकीय नेते किंवा सरकारचीच चूक होती का? याचे उत्तर हे अर्थातच ‘नाही’ असेच आहे. स्वतः तुकाराम मुंढे हेदेखील त्यासाठी तितकेच कारणीभूत आहेत. रुजू झाल्या झाल्या लागलीच फटकेबाजी करण्याऐवजी त्यांनी क्रिकेटर राहुल द्रविडप्रमाणे खेळपट्टीवर टिकून बॅटिंग केली असती तर, ते दिलेल्या धावांचा डोंगर हा सहजरित्या उभा करू शकले असते. म्हणजेच त्यांच्या हातून अनेक ठिकाणी अनेक लोकोपयोगी कामेदेखील झाली असती.(IAS Tukaram munde)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here