Agriculture | सोयाबीनने दिला शेतकऱ्यांना दिलासा; असा आहे दर

0
21

Agriculture |  ह्या हंगामात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. सोबतच, सोयाबीनला (soyabean) सध्या कमी दरही मिळत आहे. यंदा सोयाबीनमधून शेतकऱ्यांना फारसा नफा हाती लागला नाही. पण, आता सोयाबीनच्या भावात थोडी वाढ सुरूवात झाली आहे.

सध्या प्रति क्विंटलमागे पाच हजार इतका भाव आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावात आणखी वाढ होण्याची उत्पादकांना आशा आहे. दरम्यान, विदर्भामध्ये सद्यस्थितीत सोयाबीनचे (soyabean) दर हे स्थिरावलेले असून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशीच अकोला बाजारात सोयाबीनच्या भावात काही प्रमाणात वाढ झालेली आहे. कमाल ५ हजार १६५ रूपये तर सरासरी भाव हा ४ हजार ९०० रूपयांपर्यत मिळत आहे.

  काल सोयाबीनचे दर हे ४५ रुपयांनी खाली आले असून, ४ हजार पासून ते ५ हजार १५५ रूपयांपर्यत प्रति क्विंटलमागे सोयाबीनला भाव मिळाला. आता हळूहळू या दरात आणखी सुधारणा होत असून, डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनचे दर हे १० रुपयांनी वाढले. त्यामुळे सोयाबीनला(soyabean) कमीत कमी ४ हजार १५० ते ५ हजार १६५ रूपये भाव मिळाला असून सरासरी भाव हा ४ हजार ९०० रूपये असा होता. बाजारात सोयाबीनची आवक वाढत असून, दोन दिवसांत ५ हजार ४०३ क्विंटल इतकी आवक झाली आहे.(Agriculture)

Political News | ‘महादेवा मला मंत्री करा…’; शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याचं साकडं

 सोयाबीन उत्पादनात घट

या हंगामात पावसाने मध्येच मारलेली दडी, शेतकऱ्यांसमोर आलेली दुबार पेरणीची वेळ, ती करूनही म्हणावे तसे पीक हाती न आल्याने, यंदा सोयाबीनवर ‘यलो मोझॅक’चे आक्रमण झाले, त्यामुळे सोयाबीन उत्पादनाला त्याचा मोठा फटका बसला. शेतकऱ्यांच्या हाती एकरी ३ ते ४ तर काहींनी २ ते ३ क्विंटल सोयाबीन आलं आहे. 

त्यामुळं उत्पादनाचा खर्च निघेल इतकाही दर मिळाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच आता अतिवृष्टीमुळे उरलेल्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यात सणांचा काळ आणि डोक्यावरचं कर्ज हे कर्ज फेडण्यासाठी बाजारात मिळेल त्या भावात पीक विकण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी मोठा फटका हा सहन करावा लागला आहे.(Agriculture)

दरम्यान, अजूनही अनेक शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेमुळे काही प्रमाणात सोयाबीन(soyabean) हे घरातच साठवून ठेवलेलं आहे. शेतकऱ्याचं म्हणणं आहे की यंदा निसर्गाच्या लहरीपणानामुळं पेरलेल्या पिकाच्या आरध्या प्रमाणातच उत्पादन मिळाले आहे. त्यातही गरजेपोटी काही सोयाबीन विकलं आणि भाव वाढेल ह्या आशेने साठलेले आहे.

दरम्यान, आता सोयाबीनला ५ हजारांवर भाव असून अपेक्षेप्रमाणे किमान सहा हजारांवर भाव असावा, हा इच्छित भाव वाढल्यानंतरच सोयाबीन बाजारात आणू, असं मत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. (Agriculture)

Travel Update | फिरायला जायचंय! ‘हे’ सुंदर ठिकाण पर्वतांची राणी म्हणून ओळखले जाते


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here