सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी फांगदर खामखेडा ता. देवळा येथील शिक्षक खंडू मोरे यांची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक अडचणींमधून आजही गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी जीवाचे रान करणारे शिक्षक आहेत. खंडू मोरे हे त्यातील एक. फांगदर या आदिवासी वस्तीवर २ जुलै २००१ रोजी खाजगी कौलारू घरात ग्रामपंचायतीने वस्तीशाळा सुरु केली. १५ विध्यार्थ्यांवर वस्तीतच मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. या वस्तीशाळेत स्वयंसेवी शिक्षक म्हणून त्यांनी कामाला सुरवात केली.
सुरवातीला खाजगी कौलारू घर, कांदा चाळ, पाचटाच्या झापात अशी आठ वर्ष शाळा सुरु राहिली. एक शिक्षक व चार वर्ग असून देखील झोकून देऊन काम करत. कष्ट, संघर्ष, कल्पकता यांच्या जोरावर गुणवत्ता सिद्ध केली. आज त्यांच्या कार्याला महाराष्ट्र शासनाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने राजमान्यता मिळाली. वस्तीशाळेचा राज्यातील पहिला राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणारे खंडू मोरे पहिले शिक्षक ठरले.
Deola | देवळ्यात बिबट्याची दहशत; घरातून बाहेर पडणे झाले मुश्किल
Deola | प्रतिकुल परिस्थिततीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले
अल्पश्या मानधनावर, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पाचटाच्या झापात आठ वर्ष शाळा नाविन्यपूर्ण उपक्रमांची जोड देत सुरु ठेवली. खडकाळ माळरानावर इमारत झाल्यावर समाज संपर्क व लोकांच्या सहभागातून अंतरराष्ट्रीय स्तरावरून पंधरा लाखांहून अधिक लोकसहभागातून शाळेला भरघोस शैक्षणीक मदत मिळवत शाळेचा कायापालट घडवून आणला. आदर्शवत डिजिटल शाळा घडवली कल्पक उपक्रमांनी माळरानावरील मुले हायटेक केली. नव्वद टक्के शेतमजूरांची पाल्य असतांनाही ई-लर्निंगच्या माध्यमातून रंजकतेने अध्यापन करत आहेत. दोनशेवर झाडे जगवत औषधी बाग फुलवली. ज्ञानरचनावादी व सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातुन गुणवत्ता वाढवली.
शिक्षणाच्या वाटेवरील आनंदवन म्हणून राज्यभरात शाळेचा लौकिक मिळवला आहे. वस्तीशाळेतील शेतमजुरांच्या मुलांना विमानप्रवास घडवून मुलांना शिक्षणमंत्र्यांशी भेट घडवणारा शिक्षक म्हणून त्यांनी राज्याला ओळख करून दिली. शाळेच्या छतावरून वाहून जाणाऱ्या पाण्याने बंद पडलेला बोरवेल विध्यार्थ्यांच्या मदतीने पुनर्जीवित केलेला उपक्रम राष्ट्रीय स्तरावर निवडला गेला. शिक्षणाच्या वारीत जिल्ह्यातील एकमेव शाळा म्हणून निवड होत बहुमान मिळवला.
Deola | प्रवाशांच्या जीवाशी खेळ; देवळ्यात बसचे चाक निखळले
आंतरराष्ट्रीय स्तरावरून शाळेला मदत मिळवून दिली
अंतरराष्ट्रीय स्तरावरून शाळेला भरघोस शैक्षणीक मदत मिळवली. वस्तीशाळेत शैक्षणिक गुणवत्ता वाढवत शैक्षणिक पर्यटनस्थळ म्हणून दहा हजाराहून अधिक लोकांनी शाळा भेटीतून त्यांच्या शाळेला गुणवत्तेचे केंद्र म्हणून लौकिक मिळवून दिला. अंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विविध नियतकालिकांमधून लेखन तसेच शोध निबंध प्रसिद्ध व पुरस्कार प्राप्त शासनाच्या दीक्षा ॲपच्या व्हिडीओ निर्मितीत देखील त्यांनी योगदान दिले आहे. अशा प्रयोगशील व चाकोरीभाहेर जाऊन प्रयोग करत कल्पकतेने व रंजक, सोप्या अनुभवातून विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या या शिक्षकाला राज्य शासनाचा राज्य पुरस्कार जाहीर झाला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम