Aditya Thackeray | आदित्य ठाकरे नाशिकमध्ये; असा असेल ‘नशिक दौरा’..?

0
18
Aditya Thackeray
Aditya Thackeray

Aditya Thackeray |  आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचे दिसत आहे. सर्वांनीच आपापली शक्ती पणाला लावली असून तर, निवडणुकीआधी अनेक नेत्यांनी त्यांच्या सोयीनुसार पक्ष बदलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे या पिता पुत्रांनीही महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे.

शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे त्यांच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचा दौरा करत असून, त्यांच्या पाठोपाठ त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनीही ‘संवाद’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्यावर भर दिला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर १४ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे यांचा नशिक दौरा असून, याअंतर्गत ते नशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकांच्या संभाव्य तारखा जाहीर झाल्या असून, आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची चलबिचल पहायला मिळत आहे.(Aditya Thackeray)

Ashok Chavhan | अशोक चव्हाण पक्षप्रवेशासाठी इतके उतावीळ का..?

Aditya Thackeray | नाशिकचे राजकीय वतावरण तापले 

आधी भाजपने पंतप्रधानांच्या हस्ते नाशिकमध्ये प्रचाराचे नारळ फोडले. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा महामेळावा नाशिकमध्ये पार पडला. तर, गेल्या दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता “आमच्या कामांमुळे पोटदुखीचा त्रास होणाऱ्यांची पोटदुखी कायमची घालवणार” असल्याचे सूचक वक्तव्यदेखील यावेळी केले होते. एकूणच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील राजकारण तापू लागले आहे.(Aditya Thackeray)

विरोधकांच्या महाविकास आघाडीत नाशिक लोकसभा मतदारसंघावर शिवसना ठाकरे गटाने दावा केला असून,  त्यानुसार ठाकरे गटाने तयारीही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिकचा बालेकिल्ला अजून मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. १४ फेब्रुवारी रोजी आदित्य ठाकरे नाशिकमद्धी येणार असून, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी शिर्डी दौऱ्यावर आहेत.(Aditya Thackeray)

Lok Sabha 2024 | काय सांगता..! आता खासदार अमोल कोल्हेही…

असा असेल आदित्य ठाकरेंचा ‘नशिक’ दौरा

१४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आदित्य ठाकरे कलानगर, वांद्रे येथून वाहनाने इगतपुरी, नाशिकच्या दिशेने  रवाना होतील. त्यानंतर दुपारी १ वाजता ते इगतपुरी येथे ते ‘संवाद मेळावा’ घेतील. दुपारी २.१५ वाजता ते इगतपुरी येथून सिन्नरकडे मार्गस्थ होतील. दुपारी ३.३० वाजता ते सिन्नर येथे ‘संवाद मेळावा’ घेतील. संध्याकाळी ४.१५ वाजता सिन्नरहून ते नाशिककडे रवाना होतील. संध्याकाळी ५ वाजता ते नाशिक शहरात संवाद मेळावा घेणार आहेत. (Aditya Thackeray)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here