अपघातात दुर्मिळ भारद्वाज पक्ष्याचा मृत्यू : पक्षीप्रेमी संदीप किर्वे भावुक

0
36

राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : “जीवो जीवस्य जीवनम” हेच निसर्गाचे खरे सूत्र आहे त्यामुळे जीवनाच्या या साखळीतील एक जरी कडी निखळली तरी सगळा संसारच अडचणीत येईल.म्हणून इथल्या प्रत्येक जीवाचे संरक्षण महत्वाचे आहे. आजच्या आधुनिक तंत्रज्ञान माहिती आणि धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात मानव हा आपल्या गरजेपोटी पूर्णपणे आपल्या निसर्गाला नैसर्गिक साधन संपत्तीसह वन्य प्राणी पशु पक्ष्यांना पुरता विसरत चालला आहे. याचा थेट परिणाम नैसर्गिक परिसंस्थेवर प्रामुख्याने होतांना दिसतो आहे.

आजच्या युगात रस्ता अपघातात मृत्यू मुखी पडणाऱ्या पक्षी प्रजातींची संख्या ही सर्वात जास्त आहे.यामध्ये भारद्वाज,लाल बुड्या,बुलबुल, ठिपकेवाला पिंगळा, साळुंकी, रातवा, निलपंख, राखी, वटवटा, होला, सातभाई, कोकीळ, व चातक या प्रजातींच्या पक्ष्यांचे प्रमाण अधिक आहे.

सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे हे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासाठी गेले होते त्यानंतर परतीच्या मार्गाने ते घोटी- सिन्नर महामार्गावरून घोटीला येत असतांना त्यांच्या वाहनाच्या समोरून एक गाडी भरधाव वेगाने चालत होती अश्याच परिस्थिती एक भारद्वाज पक्षी उडत उडत रस्ता ओलांडत असतांना एकदम वेगाने जाणाऱ्या गाडीच्या डाव्या बाजूच्या काचेवर आदळला आणि खाली पडला. ही परिस्थिती प्रत्यक्ष पक्षी प्रेमी संदीप किर्वे यांनी बघितली आणि त्याक्षणी आपली गाडी थांबवून त्या जखमी अवस्थेतील तरफडत असलेल्या भारद्वाज (कुंभार कुकडा) पक्षाला अलगत उचलत तात्काळ उपचारासाठी आपल्या गाडीत घेतले आणि उपचारासाठी घोटी गाठली. प्रवासात असतांनाच श्री किर्वे यांनी पक्षीमित्र पशुवैद्यकीय डॉ अधिकारी यांच्याशी फोनवर संपर्क करून सदर घटनेची सविस्तर माहिती सांगितली समोरून देखील सकारात्मक प्रतिसाद आला आणि त्या पक्षाला तात्काळ उपचारासाठी घेऊन या असे ऐकताच किर्वे यांनी तात्काळ घोटी शहराकडे आपले वाहन घेतले.

घोटी शहरात पोहचताच श्री किर्वे यांनी सदर जखमी पक्षाला गाडीतून बाहेर घेण्यासाठी गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि बघतो तर काय तोपर्यंत भारद्वाज पक्ष्याचा अंत झाला होता. एक पक्ष्यासाठी त्याचे प्राण वाचविण्यासाठी श्री किर्वे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु दुर्दैवाने उपचारा आधीच त्या जखमी पक्ष्याने आपल्या मृत्यूला कवटाळले ही परिस्थिती बघून श्री किर्वे हे भावुक झाले आणि हळहळ व्यक्त करत निराश होत आपल्या कार्यकर्त्यांना त्या पक्ष्याचा शेवट तरी व्यवस्थित करा असे प्रताप जाखेरे,शिवा तातळे यांना सूचित केले.

या घटनेनंतर संदीप किर्वे यांनी एक पक्षीप्रेमी म्हणून आवाहन केले की दैनंदिन जीवनात आपण आपल्या सभावताली असलेल्या निसर्गावर पशु पक्षी प्राणी मात्रांवर देखील लक्ष्य दिले पाहिजे त्यांचे संवर्धन केले पाहिजे ही काळाची गरज आहे.

दरम्यान ही एकच घटना जरी आज आपल्या डोळ्यासमोर असली तरी याकडे जरा बारकाईने अभ्यास करत बघितले तर प्रति दिवसाला कितीतरी पक्षी अपघातात मृत्यू पावत असतील याचा आपण विचारही करू शकत नाही.
विविध कारणांमुळे पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो अशी माहिती अभ्यासकांनी दिली आहे. रस्ते अपघात हे त्यातले मुख्य कारण आहे. लोकडाऊन काळात ही संख्या एकदम कमी झाली होती. लॉकडाऊन पूर्वीचे आणि नंतरचे जे प्रमाण होते ते कडक लॉकडाऊन मध्ये एकदमच कमी झाले होते. रस्ते अपघातात हजारो पक्षी मृत्युमुखी पडत असून यामध्ये भारद्वाज, ठिपकेवाला पिंगळा,रातवा, सातभाई या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
रस्ते अपघातात वन्य प्राणी आणि पक्षी सुद्धा सुटलेले नाहीत. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची वाढती संख्या भरधाव वेग,एल इ डी लाईट पक्ष्यांच्या काही प्रजातींच्या मुळावर उठले आहेत. असा अहवाल देखील काही प्राणिशास्र विद्यापीठांना प्राप्त झालेला आहे. मृत्यू मुखी पडणारे विविध प्रजातींचे पक्षी आणि त्यामागील कारणांचा शोध त्यांचा जनुकीय अभ्यास या विषयावर प्राणी शास्रात तज्ञ असलेल्या काही नामांकित आचार्य व्यक्तींनी संशोधन केलेले आहे. मृत्यू मुखी पडणारे विविध प्रजातींचे पक्षी व त्याची कारणे यावर संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार निरनिराळे जवळपास १३ प्रकारचे धोके पुढे आले आहेत. यामध्ये रस्ता अपघात,पक्ष्यांची शिकार व विक्री,उच्च दाबाच्या विद्युत तारांचा संपर्क,विष मिश्रित अन्न व पाणी पिल्याने, अवकाळी वादळी पाऊस आणि गारपीठ अतिवृष्टी, मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात अडकून मृत्यू, शेतामध्ये वापरण्यात येत असलेल्या कीटक नाशकांमुळे मृत्यू,पतंगीसाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांज्यामुळे मृत्यू, शेतामध्ये वापरण्यात येत असलेल्या कीटक नाशकामुळे मारले जाऊन होणारा मृत्यू , उन्हाळ्यातील तापमानामुळे होणारा मृत्यू, इमारतीवरील कांचांवर आदळून होणारा मृत्यू, प्राणी व शिकारी यांचेकडून मारले जाऊन होणारे मृत्यू,तसेच अन्न पाणी न मिळणे व आजार यामुळे होणारे मृत्यू असे एकूण ८२ प्रजातींचे पक्षी या विविध कारणांनी मृत्यू मुखी पडल्याची नोंद घेतलेली आहे.

यात रस्ता अपघातांची संख्या अधिक रस्ता अपघाताने मृत्यू मुखी पडणाऱ्या पक्षी प्रजातींची सर्वात जास्त संख्या आहे. यामध्ये भारद्वाज, लाल बुड्या,बुलबुल,ठिपकेवाला पिंगळा, साळुंकी, रातवा, निलपंख, राखी, वटवटा, होला, सातभाई, कोकीळ व चातक या प्रजातींच्या पक्ष्यांचे प्रमाण अधिक आहे. संशोधक आणि अभ्यासकांच्या माहितीनुसार तीन वर्षात शेकडो पक्षी रस्ता अपघाताने मृत्यु मुखी पडलेले आढळून आलेले आहे. त्यामध्ये जवळपास ५५ पक्षी प्रजातींचा समावेश आहे. जवळपास २ ते ३ पक्षी दर ३० की मी च्या अंतरावर मृत्यमुखी पडतात असे आढळून आले आहे.

“इगतपुरी तालुका हा पावसाबरोबरच वन्य जीवांचे देखील माहेर घर आहे त्यामुळे वाहन चालकांनी रस्त्याने वाहन चालविताना आपल्यासोबत पशु पक्ष्यांची देखील काळजी घ्यावी व वन विभागाने देखील तसे सूचना फलक लावावेत जेणे करून वन्य प्राणी व पक्षी वाचतील.आज”भारद्वाज पक्ष्यासह पक्ष्यांच्या अनेक प्रजाती या दुर्मिळ झाल्या आहेत त्यात छोट्या मोठ्या अपघातात पक्षी मृत पावतात आपणही आपली जशी काळजी घेतो तशी पशु पक्ष्यांची देखील काळजी घेतली पाहिजे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे.”
– संदीप किर्वे , मनसे उपजिल्हाध्यक्ष तथा पक्षीप्रेमी

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here