ACB trap: भ्रष्टाचाराचे पीक जोमाने सुरू आहे. धाडी पडून देखील लाचखोर आपली सवय मोडायला तयार नाहीत हेच पुन्हा अधोरेखित झाले आहे. नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी पुन्हा धमाकेदार कारवाई केली आहे. वालावलकर यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने नगर शहराजवळ सापळा रचून एमआयडीसी अहमदनगर उपविभागाचे सहा. अभियंत्याला तब्बल एक कोटी रूपयांची लाच घेताना वालावलकर यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही मोठी कारवाई असल्याने कमालीची गुप्तता पाळली होती.
लाचखोर अमित किशोर गायकवाड आनंदविहार नागापुर, अहमदनगर, मुळ रा. चिंचोली ता.राहुरी असे त्या सहा.अभियंत्याचे नाव आहे. दरम्यान, गायकवाड यांनी ही लाच स्वतःसाठी तसेच तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ या दोघांसाठी स्वीकारली असल्याचे चौकशीत सिद्ध झाले.
प्रत्यक्ष लाचखोर गायकवाड व गणेश वाघ या दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ही तक्रार केली त्यानंतर कारवाई झाली. तक्रारीनंतर वालावलकर यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. या मोठ्या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता बाळगली होती. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. आतापर्यंत ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.
Education scam: हिरेंच्या शिक्षण संस्थेने शासनाचे लाखो रुपये लुबाडले!
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेवीदाराने अहमदनगर येथील एमआयडीसी अंतर्गत १०० एम एम व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम केले. या कामाचे दोन कोटी 66 लाख 99 हजार 244 रूपयांचे बिल तसेच सदर बिलांवरती तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ याच्या मागील तारखेचे आउटवर्ड करुन त्यावर सह्या घेवुन सदरचे देयक पाठविण्याचे बदल्यात गायकवाड याने स्वतःसाठी व वाघ याच्या करीता या बिलाचे कामाचे व यापुर्वीच्या अदा केलेल्या काही बिलांची बक्षिस म्हणुन एक कोटी रूपये लाचेची मागणी करून लाच स्विकारली होती. अशी तक्रार शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
Nepal bhukamp: नेपाळ भूकंपाने हादरले 129 मृत्यू; भारतातही धक्के
नाशिकच्या पथकाने शुक्रवारी दुपारी नगर – संभाजीनगर महामार्गावरील शेंडी शिवारात आनंद सुपर मार्केट बिंल्डिंगच्या परिसरात सापळा रचला. त्यावेळी मागणी केलेली लाचेची एक कोटी रूपयांची रक्कम गायकवाड याने स्वतःसाठी व वाघ याकरीता एका इनोव्हा कारमध्ये पंच, साक्षीदारांसमक्ष स्विकारली. त्याचवेळी गायकवाड याने त्याच्या मोबाईलवरुन वाघ याला फोन वरून लाचेची रक्कमेबाबत माहिती दिली व त्याच्या हिस्स्याची 50 टक्के कोठे पोहचवावी असे विचारले मात्र वाघ याने सांगीतले की, ‘राहु दे तुझ्याकडे बोलतो मी ते तुलाच पोहचवायचे आहेत एका ठिकाणी, सांगतो नंतर सध्या तुझ्या सेफ कस्टडीमध्ये ठेवुन दे’, असे म्हणुन वाघ याने गायकवाड याच्या लाच मागणीस व स्विकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे सिद्ध झाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम