Acb raid : लाचखोरी काही थांबेना ; तीन लाखांची लाच स्वीकारतांना पोलीस निरीक्षकासह दोघे ताब्यात

0
14

ACB raid :  दाखल गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी लाचेची मागणी, पोलीस निरीक्षकासह दोघा जणांना ताब्यात घेण्यात आल आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात सह आरोपी न करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह दोघांना धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहुल बाबासाहेब गायकवाड , पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस ठाणे भुसावळ, तुषार पाटील पोलीस नाईक, व खाजगी पेंटर ऋषी दुर्गादास शुक्ला रा. भुसावळ असे आरोपींची नाव असून तक्रारदाराकडून पाच लाखांपैकी तीन लाख रुपयांची रक्कम घेताना खाजगी पंटर ला धुळे एसीबी च्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार राजन कदम, पोलीस कॉन्स्टेबल संतोष पावरा, पोलीस कॉन्स्टेबल रामदास बारेला, पोलीस हवालदार सुधीर मोरे आधी पथकाने केली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here