28 लाखांची लाच घेतांना कार्यकारी अभियंता रंगेहाथ ACB च्या जाळ्यात

0
37

नाशिक: राज्यात लाचखोरीचे प्रमाण वाढले असून यात कुठेलच क्षेत्र व जिल्हा मागे नसल्याचे वारंवार घडत आहे. कालच आरोग्य उपसंचालक कार्यालयातील एक लेखाधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर आज पुन्हा आदिवासी विकास विभागातील कार्यकारी अभियंता बागुल हा अधिकारी तब्बल २८ लाखांची लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे. यामुळे आदिवासी विकास विभागातील भ्रष्ट व्यक्ती व भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील या मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत विभागाला माहिती मिळाल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून अधिकारी बागुल यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लक्ष ठेवून होता, बागुल आज मुंबईहून आल्यानंतर एका कॉन्ट्रॅक्टर सोबत बोलणी झाली व लाच घेत असताना त्याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.

या कारवाई नंतर शहरात चर्चांना उधाण आले आहे. या लाचखोरीत अजून कोणी सहभागी आहे का हे बघन महत्वाचे आहे, नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून संबंधितावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. लाचलुचपत विभाग असाच ॲक्टीव्ह राहिल्यास लाचखोरांना चांगला आळा बसेल.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात……


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here