लाचखोर जिल्हा उपनिबंधक खरे ACB च्या जाळ्यात; 30 लाखांची लाच घेणे भोवले

0
2

नाशिक: जिल्ह्यातील मुजोर अधिकाऱ्यांमध्ये ज्या अधिकाऱ्याची गणना केली जात होती त्यातील जिल्हा उपनिबंधक सतीश खरे याच्यासह वकीलाला तब्बल ३० लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाला रंगेहाथ सापडला आहे. या अधिकाऱ्याने आजपर्यंत अनेक प्रकरणात सर्वसामान्यांना त्रास दिल्याच्या तक्रारी होत्या मात्र शिताफीने तो नेहमी निसटत आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. आजच्या कारवाईने सहकारसह सर्वच क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक विभागाच्या एसीबी अधिक्षकपदी शर्मिष्ठा वालावलकर यांची नियुक्ती झाल्यापासून मोठ्या संख्येने लाचखोर सापडत आहेत. यापूर्वी देखील सापळे लावले जात असले तरी प्रत्यक्षात त्यामध्ये यश येत नव्हते. आता मात्र, वालावलकर यांच्या नेतृत्वात एसीबीच्यावतीने जोरदार कारवाई सुरू असल्याने नागरिकांनी कौतुक केले आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये जवळपास दररोज एक लाचखोर जाळ्यात सापडत आहे. आता मात्र, एसीबीच्या पथकाला थेट जिल्हा उपनिबंधकच गवसल्याने नागरिकांनी कौतुक केले आहे.

Maharashtra Violence: महाराष्ट्र पेट घेत आहे ! 2 जिल्ह्यांमध्ये 2 दिवसांपासून दंगल, जाळपोळ, तोडफोड; 4 पोलीस जखमी, 31 जण ताब्यात
यशस्वी सापळा कारवाई
▶️ युनिट -नाशिक
▶️ तक्रारदार- पुरुष, वय- 40 वर्ष.
▶️ आलोसे:- 1) सतिश भाऊराव खरे , वय 57 वर्ष. पद -जिल्हा उपनिबंधक, सहकरी संस्था नाशिक वर्ग-1 रा. फ्लॅट नंबर 201, आई हाईट्स, कॉलेज रोड, नाशिक.
2) शैलेश सुमातीलाल सभद्रा वय 32 वर्षे धंदा वकील, खाजगी ईसम, रा . फ्लॅट नं 4, उर्वी अपार्टमेंट सौभाग्य नगर, गंगापूर रोड, नाशिक

▶️ लाचेची मागणी- 30,00,000/-₹
दि.15/5/2023

▶️ लाच स्वीकारली- 30,00,000/- ₹
दि.15/05/2023

▶️ लाचेचे कारण –
यातील तक्रारदार हे नुकतेच नाशिक जिल्ह्यातील एका कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये संचालक पदी कायदेशीर पद्धतीने व वैधपणे म्हणून निवडून आले आहेत. त्यांचे निवडी विरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणावरवर सुनावणी घेऊन ती सुनावणी तक्रारदार यांच्या बाजूने लावून निर्णय देण्यासाठी यातील आलोसे क्रमांक 1 यांनी स्वतः तसेच ईलोसे खाजगी इसम क्र 2 यांनी तक्रारदार यांच्याकडे 30,00,000/- (तीस लाख ) रुपये लाचेची मागणी करून सदर रक्कम आलोसे क्र 1 यांनी स्विकारण्याचे मान्य करून आलोसे क्र 1 यांनी त्यांचे राहते घरी तक्रारदार यांचे कडून 30,00,000/- रुपये (तीस लाख) रोख लाचेची रक्कम ही पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले, म्हणून त्यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

▶️ आलोसे यांचे सक्षम प्राधिकारी :-
मा. प्रधान सचिव, सहकार व पणन विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई
▶️ सापळा अधिकारी
अभिषेक पाटील ,(पोलीस उप अधीक्षक )
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक मो. 8888881449

▶️ सापळा पथक-
ASI सुकदेव मुरकुटे, पोना मनोज पाटील, पोना अजय गरुड
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

▶️ मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक
मो.न. 9371957391

मा. श्री.नारायण न्याहाळदे अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक.
मो.न. 9823291148

श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.
मो.न. 9822627288.
—————————
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी अथवा करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा.
दूरध्वनी क्रमांक-
02532578230,
02532575628
टोल फ्री क्रमांक १०६४ .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here