Crime news | सावत्र बापाकडून १४ वर्षीय मुलीवर अत्याचार

0
13
Pune
Pune

Crime news | छत्रपती संभाजीनगर शहरात एक अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मागील दहा वर्षांपासून लव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेच्या प्रियकर हा तिच्याच १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संतापजनक म्हणजे, ह्या नराधमाने पीडित अल्पवयीन मुलीला विवस्त्र करत तिचा मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केलेले होते. दरम्यान, त्याच्या सततच्या ह्या अत्याचाराला कंटाळून पीडित अल्पवयीन मुलीने थेट पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. शहरातील पुंडलिकनगर ह्या परिसरातील ही घटना घडली आहे.

Malegaon | मालेगावात घरफोडी; ४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही दोन वर्षांची असतांना तिच्या आईने पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतला होता. त्यानंतर तिचा अशपाक गफ्फार शेख या व्यक्तिसोबत दुसरा विवाह झाला होता.

मात्र, त्याची नियत खराब झाली आणि त्याने काही दिवसांपासून महिलेच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार सुरू केले.

तिला सातत्याने दुधात काहीतरी औषध देत तो तिच्यावर अत्याचार करत होता. या सर्व अत्याचारामुळे पीडित मुलगी ही  घाबरलेली होती. त्यामुळे, अखेर ह्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत नराधम बापाविरुद्ध फिर्याद दिली आहे.

Educational news | दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचा पॅटर्नच बदलला


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here