आंबेडकर चळवळीतील दिनेश अहिरे शिंदे गटात; ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

0
34

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पक्षांतर होत असून यात बाळासाहेबांच्या शिवसेनेत राज्यभरात पक्ष प्रवेश सुरू आहे. यात नाशिक जिल्ह्यात देखील सर्वपक्षीयांना धक्का बसला असून प्रत्येक पक्षातून शिवसेना बाळासाहेबांची या पक्षात नेते तसेच अनेक कार्यकर्ते जोडले जात आहेत. यात आंबेडकर वादी विचारांचे दिनेश अहिरे यांनी देखील आपल्या पक्षाला रामराम ठोकत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

प्रवेशानंतर लागलीच त्यांना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी ग्रामीण मा.विभाग नियुक्ती केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. गेल्या वीस वर्षापासून चळवळीत काम करणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिनेश अहिरे यांची वर्णी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली . मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या निवडीचे पत्र दिले आहे. दिनेश आहिरे व त्यांचे सर्व सहकारी यांनी बाळासाहेबांचे शिवसेना या पक्षात प्रवेश केला असून येणाऱ्या काळात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे यांनी जो विश्वास दाखवला सार्थ ठरवून जनतेची सेवा करणार असे अहिरे यांनी सांगितले यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी अहिरे यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला असून पक्ष वाढीचा ध्यास घेतला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here