AAI Recruitment | परीक्षा न देताच एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

0
20

AAI Recruitment : एअर इंडियामध्ये नोकरी करण्याचे भारतातील अनेक तरूणांचे स्वप्न असते. जर तुम्ही देखील एअर इंडियामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. (AAI Recruitment) एअर इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे.

AAI Cargo Logistics and Allied Services Company Limited (AAICLAS) ने संपूर्ण भारतात सिक्युरिटी स्क्रिनर-फ्रेशरच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदांवर भरती करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवारांनी 8 डिसेंबर किंवा त्यापूर्वी AAICLAS च्या अधिकृत वेबसाईटवर aaiclas.aero वर जाऊन अर्ज करायचे आहेत.

Nashik Election | हिरे बंधूंसह डोखळे, गुळवे, कुंभार्डे दिग्गजांचे अर्ज झाले बाद

  • किती पदांवर असणार भरती ?

या भरती अंतर्गत तब्बल 906 सिक्युरिटी स्क्रिनर फ्रेशरच्या रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. जे उमेदवार या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत. अशा तरुणांनी AAICLAS च्या अधिकृत वेबसाईटवर aaiclas.aero वर जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

  • उमेदवाराची पात्रता आणि वयोमर्यादा काय?

या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड, विद्यापीठ किंवा संस्थेतील पदवी घेतलेली असावी. या पदांसाठी सामान्य प्रवर्गातील (general category) उमेदवारांनी पदवीला 60% गुण आणि SC/ST उमेदवारांनी 55% गुण असणे आवश्यक आहे. शिवाय, या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराचे कमाल वय हे 27 वर्षे असणे महत्वाचे आहे. जर यापेक्षा वय जास्त असेल तर ते उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.(AAI Recruitment)

  • अर्ज करण्यासाठी किती शुल्क ?

या पदांसाठी इच्छुक असलेल्या सामान्य/ओबीसी प्रवर्गातील (Open/OBC Category) उमेदवारांसाठी अर्जाचे शुल्क हे  750 आहे तर महिला आणि SC/ST आणि EWS उमेदवारांसाठी 100 रूपये अर्ज शुल्क असणार आहे. (AAI Recruitment)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here