Crime news | चांदवडच्या तरुणाला दिंडोरीतील पालखेड धरणाजवळ निर्घुणपणे संपवलं

0
22

Crime news | नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेल्या लोखंडेवाडी ह्या शिवारातील पालखेड धरणाच्या भरावाच्या किनारी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वणी पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चांदवड तालुक्यातील खडकजांब येथील युवकाचा हा मृतदेह असल्याची महिती समोर आलेली आहे. या मृतदेहाच्या तोंडावर तसेच शरीराच्या अन्य भागांवर धारदार हत्याराने वार केल्याचेही  आढळून आलेले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , वणी पोलिस ठाणे हद्दीतील लोखंडेवाडी ह्या शिवारात असलेल्या पालखेड धरणाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आणि धरणाच्या भरावाच्या दगडांवर (दि. २१) रोजी दुपारी ३ ते ता. (दि. २२) रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान किशोर दगु उशीर (वय २६) राहणार खडकजांब ता. चांदवड यावर अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने कपाळावर तसेच तोंडाला, जबड्याला, दोन्ही डोळ्यांना, चेहऱ्यावर, गालावर, डोक्यावर गंभीर वार करून त्याचा खुन केल्याची घटना गाडली आहे.
दरम्यान, ह्या तरुणाचा मृतदेह लोखंडेवाडी शिवारातील पालखेड धरणाच्या भरावाच्या आत ओढत नेवुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. याबाबत मृत तरुणाचे नातेवाईक सुरेश सुधाकर कांडेकर, (वय ३९) रा. खडकजांब यांच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, तरुणाचा मृतदेह हा ग्रामीण रुग्णालयात रात्री शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता. पण, नातेवाईकांच्या मागणीनुसार नंतर मृतदेह नाशिक येथे फॉरेन्सिक ओपिनियनसाठी पाठविण्यात आलेला आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे अधिक तपास करीत आहेत. याबाबत वणी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आले नाही.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here