Nashik news | नाशिकच्या सिन्नर- नाशिक ह्या महामार्गावरील उद्योग भवन परिसरात साईवेज ट्रान्स्पोर्ट या कंपनीच्या गोडाऊनमध्ये उभ्या असलेल्या केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
शनिवारी (दि. १८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. सुदैवाने, यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर ह्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.
सिन्नर-नाशिक महामार्गालगतच्या उद्योगभवन येथे साईवेज ट्रान्स्पोर्ट ही कंपनी असून इमारतीच्या पाठीमागे ह्या कंपनीचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये संदीप भरत गुळे यांची ट्रक (एमएच १५ एजी ०५६९) ही उभी होती.
Viral news | भर लग्नात नवरदेवाच्या भावंडात अन् मित्रांत तूफान हाणामारी
या ट्रकमध्ये केमिकलने भरलेले काही ड्रम ठेवण्यात आलेले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी दीड वाजता ड्रममधील केमिकलने अचानक पेट घेतला व बघता बघता ह्या आगीने भीषण स्वरूप घेतले.
ट्रकमधून धुराचे लोट उठू लागल्याने येथील नागरिकांनी तातडीने सिन्नर नगरपरिषदेच्या आणि एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर सिन्नर व एमआयडीसी या अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, या आगीत संपूर्ण ट्रक हा जळून खाक झाला आहे.
सिन्नर अग्निशमन दलाचे फायरमन नवनाथ जोंधळे, सागर डावरे, आकाश देवकर, लक्ष्मण सोनकुसरे यांच्यासह एमआयडीसीच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणली आहे.
Nashik news | नाशिकची भरारी..! चीनचा ७ वर्ष जुना विक्रम मोडला
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम