Nashik News | सोग्रस जवळील कुंदलगाव शिवारात मनमाड-मालेगाव रस्त्यावर ट्रॅक्टरसमोर अचानक कंटेनर आल्यामुळे ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या खाली जाऊन झालेल्या ह्या भीषण अपघातात ट्रॅक्टरचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अपघातात मृत व्यक्तीचे नाव अविनाश प्रभाकर बर्डे असून, ते नगरसूल, ता. येवला येथे स्थायिक होते. तयांचा ट्रॅक्टर (एमएच १२, जेएन ५७९८) आणि त्याला पाठीमागे जोडलेल्या दोन ट्रॉल्यांसोबत मनमाड-मालेगाव रोडने मालेगावकडे जात होते. त्यावेळी कुंदलगाव शिवारात मालेगावकडून कंटेनर अचानक समोर आल्यामुळे ट्रॅक्टरचालक अविनाश बर्डे यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले होते.
तयांचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या खाली जाऊन उलटला. दरम्यान, या अपघातात ट्रॅक्टरचालक अविनाश बर्डे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेबाबत अनिल पवार (रा. नारायणगाव, जुन्नर) यांनी चांदवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस कर्मचारी अशोक पवार हे या घटनेचा पुढील सविस्तर तपास करीत आहेत.
MH-SET : महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा लवकरच
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम