Army vehicle accident | जबलपूरहून बंगळूरूला जाणाऱ्या सैन्य दलाच्या एका गाडीचा भीषण अपघात झाला आहे. पाठीमागून येणाऱ्या खासगी टँकरने सैन्य दलाच्या या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर एक जवान गंभीर जखमी आहे. या अपघातात मृत जवान हा सांगलीचा सुपुत्र आहे. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबावर एकच शोककळा पसरली आहे.
सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी या गावचे सुपुत्र तसेच पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, त्यांचा एक सहकारी जवानही गंभीर जखमी आहे. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास जबलपूर जवळ हा अपघात घडला आहे. दरम्यान, रुग्णालयात पोहचण्या आधीच हवालदार पोपट खोत यांची प्राणज्योत मालवली.
Train Accident |भीषण अपघात..! मालगाडी वर पूलावरून कोसळली कार
पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण सांगली जिल्हयावर शोककळा पसरली आहे. हुशार तसेच मनमिळावू असलेल्या पोपट यांनी त्यांच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर भारतीय सैन्य दलात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले होते. शाहिद पोपट खोत यांच्या गुणवत्तेची तालुक्यात प्रशंसा होत असे. पण, आता त्यांच्या या अपघाती जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शाहिद पोपट खोत यांचे वय हे ३४ वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई व बहिणी असा संपूर्ण परिवार आहे. पोपट खोत यांचं पार्थिव आता त्यांच्या मुळगावी लोणारवाडी येथे आणलं जात आहे. देशसेवा बजावत असताना, पोपट खोत यांचे अपघाती निधन झाले असून, त्यांच्या पार्थिवावर आता त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निधनाच्या बातमीने संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माहिती मिळताच आईचा व पत्नीचा आक्रोश हा हृदय पिळवटणारा होता.
Nashik News | देवळा पाणीपुरवठा योजनेचे ७ कर्मचारी आस्थापनेवर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम