द पॉईंट नाऊ ब्युरो : उत्तर प्रदेशात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका 10 वर्षीय मुलाने कपडे खरेदी करण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून आपल्या आईची हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील उपरबारडा या गावी एका 10 वर्षीय मुलाने आईकडे कपडे खरेदी करण्यासाठी 500 रुपये मागितले. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिला. या कारणातून संतप्त होऊन या मुलाने स्वतःच्या आईची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. त्यात अजून धक्कादायक म्हणजे त्याने आईचा गळा चिरला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार नुकताच उघड झाला आहे.
या मुलाच्या वडिलांचे 5 वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. तर त्याने 5 वी इयत्तेत असतांना शाळा सोडून दिलेली आहे. दरम्यान, याप्रकरणी बालसुधारगृहाकडून अधिक तपास सुरू आहे.
मुलांमध्ये वाढते हिंसक वृत्तीचे प्रमाण ही अतिशय चिंतेची बाब आहे. मागील काही दिवसांत अल्पवयीन मुलांद्वारे अशा अनेक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. अतिशय किरकोळ कारणातून मुलांमध्ये वाढते हिंसक वृत्तीचे प्रमाण चिंता वाढवणारे आहे. मुलांना भेटणारा सहवास, मुलांकडे होणारे दुर्लक्ष, आधुनिक जगात वाढता मोबाईलचा वापर अर्थात त्याद्वारे मुले खेळत असलेले हिंसक प्रकारचे गेम हे देखील मुलांमध्ये वाढत्या हिंसक वृत्तीचे कारण असल्याचे दिसून येत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम