yeola | नाशिकमधील येवला शहरात एका मारुती व्हॅनमध्ये गुरुवारी (दि. १६) अवैधरित्या गॅस भरताना झालेल्या मारुती व्हॅनच्या स्फोटात दहा साईभक्त हे गंभीर जखमी झाले आहेत.
या जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश असून, त्यातील एका महिलेची प्रकृती ही चिंताजनक आहे.
सीएनजीवर चालणारी अधिकृत चारचाकी वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाढले असून, तरी आजही घरगुती सिलिंडरमधील गॅस हा विशिष्ट पंपाच्या सहाय्याने वाहनाच्या टाकीत भरण्याचे प्रकार हे सुरूच आहेत. येवल्यात घडलेली ही घटना यातूनच घडल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील पूर्णा येथून शिर्डीला साईदर्शनासाठी आलेले कुटुंब हे नगरसूल रेल्वेस्थानकावर दाखल झाले. नगरसूल येथून दुसऱ्या खासगी वाहनाने ते येवला येथे आले होते. येवला येथून ते शिर्डीला जाण्यासाठी त्यांनी भाडोत्री मारुती व्हॅन घेतली होती.
UGC Net Exam | युजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर
ही व्हॅन गॅस भरण्यासाठी पक्की मशीद या भागात चालकाने नेली. कारमध्ये गॅस भरताना, हा भीषण स्फोट झाला आहे. यात एकूण १० जण जखमी झाले असून, त्यात चार लहान बालकेही आहेत, तर यातील एका महिलेची प्रकृती ही चिंताजनक आहे.
जखमींमध्ये आदित्य अवचारे (वय ११), सीमा कसबे, प्रदीप अवचारे, वैभव लिंबे (वय २२), विराज कसबे (वय ४), प्रतिभा लिंबे (वय ३९), वैदही कसबे (वय – दीड वर्ष), अनुष्का कसबे (वय १४), व गीता कसबे (वय २२), अशा एकूण दहा जणांचा यात समावेश आहे.
दरम्यान, घटनास्थळी माजी आ. मारोतराव पवार, शहर पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम, माजी नगरसेवक रिजवान शेख, मुश्रीफ शहा यांसह परिसरातील नागरिक आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते दाखल झाले आणि त्यांनी मदत केली. दरम्यान, वाहनचालक आणि गॅस भरणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कदम यांनी दिली आहे.
पोटच्या लेकीसाठी बापच ठरला हैवान! वारंवार बलात्कार अन् मारहाण; अखेर मुलीचा मृत्यू
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम