Maharashtra Nashik News: नाशिक शहरातील गजबजलेली बाजारपेठ असलेल्या एमजी रोड परिसरात काल मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत पाच ते सहा दुकानं जळून खाक झाली आहेत. रात्री उशिरापर्यंत नाशिकच्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आग कशामुळे लागली, हे अद्यापही स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
शहरात सर्वत्र दिवाळी सणाचा जल्लोष सुरू असून सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे. शहरातील एमजी रोड, मेनरोड परिसरातील बाजारपेठांत नाशिककरांची खरेदीसाठी मोठी गर्दी असते. दरम्यान, काल मध्यरात्री एमजी रोड येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे ५ ते ६ दुकानं जाळून खाक झाली आहेत. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबांद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.
देवळा | भाजपच्या आध्यात्मिक आघाडीच्या राज्य संयोजक पदी ह. भ. प. संजय धोंडगे
नाशिकमधील एमजी रोडवरील रेडक्रॉस सिग्नल परिसरातील वर्धमान शोरूमला रात्री ११ च्या सुमारास आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे या शोरूम लगतच्या बुक डेपो, संगीत विद्यालय यांसह आजूबाजूच्या आणखी ५ ते ६ दुकानांना आगीची झळ बसली.
या सर्व दुकानांत दिवाळीचे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने, या घटनेत अनेक दुकानांतील कोट्यावधी रुपये किंमतीचे दिवाळीचे साहित्य जळून भस्मसात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवळपास १५ बंब हे घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते. फटाक्यांमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, परंतु, नेमकं कारणं अजूनही कळू शकलेलं नाही.
Nashik | दिवाळीत गावी जाणाऱ्यांची होतेय लूटमार; ज्यादा प्रवासभाडेबाबत करा तक्रार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम