द पॉईंट नाऊ: शहरात गेल्या काही दिवसांपासून गाडी चोरीचे सत्र सुरूच आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक दुचाकी गाड्या चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल आहेत आणि त्यातील काही गुन्हेगारांनाही ताब्यात घेण्यात आलेले असून त्यात आता सातपूर परिसरातून चारचाकी चोरीचा ही गुन्हा दाखल झाला आहे. सातपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, कार मालकाच्या घराबाहेर उभी होती. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ नुसार दंडनीय गुन्ह्यासाठी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध एफआयआर गुन्हा नोंदवला आहे.
तक्रारदार हे सुयोग कॉलनी, काळे नगर येथील रहिवासी आहेत. बुधवारी रात्री १०:४५ च्या सुमारास तक्रारदाराने घराबाहेर त्यांची चारचाकी पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास ते बाहेर पडले तेव्हा कार तिथे नव्हती. कारबद्दल त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसह तपासल्यानंतर, मालकाने पोलिस तक्रार दाखल केली, यावेळी पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहेत गुन्हेगाराला लवकरात लवकर पकडण्याची हमीही पोलिसांनी तक्रार दारांना दिली.
शहरात वारंवार गाड्या चोरीचे सत्र सुरूच आहे. तसेच, चार चाकी चोरीची घटना पाहता घरासमोर उभे असलेले गाड्या सुद्धा सुरक्षित नसल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत. वारंवार चोरीच्या घटना घटत असल्याने नागरिक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम