नाशिक जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालला आहे. गुरुवारी 28 तारखेला उष्माघाताने शहरात तिघांचा मृत्यू झाला असून एकच खळबळ माजली आहे. दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडण्याची देखील नागरिकांना भीती वाटू लागली आहे. चालताबोलता नागरिकांचा बळी जाताना दिसत आहे.
28 एप्रिल मालेगावात उष्णतेचा पारा 43.4 अंश , नाशिक शहरात 41.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.नाशिकमधील वाढत्या उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे की, तीन नागरिकांचे चक्कर येऊन पडल्याने त्यांचा जीव गेला आहे. हवामान खात्याकडून देशभरातील विविध राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रात देखील खडक उन्हाच्या झळा दिसू लागले आहे.
प्रशासनाच्या दिलेल्या माहितीनुसार, उत्तम खरात हे जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी आले असताना त्यांना चक्कर आली. डॉक्टरांकडे नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर दुसऱी घटना नाशिक रोड येथील महाराष्ट्र अलटो इंजिनियर अँड रिसर्च अकादमीत सुरु असलेल्या राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी पंच म्हणून बदलापुरचे विकास वामन भावे आले होते. ते पंचाचे काम करत असतानाच चक्कर खाली कोसळले.उपचाराकरता रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.
तिसरी घटना मखमलाबाद गावात घडली. नाशिक रोडचे मोहन वर्मा हे मित्रासोबत बोलत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडले. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे तीनही मृत्यू उष्माघाताने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम