नाशिक प्रतिनिधी : शाळेला सुट्टी असल्याने मामाच्या गावी आलेल्या भाचीवर काळाने घाला घातला आहे. काही दिवसांपासून मामाच्या गावी आलेल्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला . रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती वनविभागातर्फे देण्यात आली आहे. गायत्री लिलके (वय ६ वर्ष ६ महिने) असे या मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. लीलके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक माहितीनुसार, मामाच्या गावी आलेली गायत्री नवनाथ लिलके (रा. कोचरगाव) काही दिवसांपूर्वी धोंडेगावा येथे मामाच्या घरी आली होती. गायत्री रात्री घराबाहेर खेळत असताना अचानक बिबट्या आला अन त्याने तिच्यावर झडप घातली यात ती जखमी झाल्याने जागीच कोसळल्याची हृदयद्रावक घटना घडली.
हल्या प्रसंगी गायत्री प्रचंड घाबरली होती. बिबट्याच्या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. यावेळी आजूबाजूच्या रहिवाशांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने घटनास्थळावरून गर्दीच्या भीतीने पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नाशिक वनपरिक्षेत्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले.
नाशिक जिल्ह्यातील गिरणारे (Girnare) पंचक्रोशीत या महिन्यातील दुसरा हल्ला आहे. काही दिवसांपूर्वी गिरणारे येथील मजुराला बिबट्याने जखमी (Leopard attack on minor girl) केले होते. ती घटना ताजी असतानाच एका चिमुकलीचा जीव गेल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. वनविभागाने वेळीच पाऊले उचलण्याची गरज असल्याचे नागरिकांनी आशा व्यक्त केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम