शेतकऱ्यांना शेती पिकासाठी फवारणी अनेक कष्ट घ्यावे लागतात. तर कीटकनाशकांच्या फवारण्या अनेक वेळा शेतकऱ्यांना अनेक रोगांचा सामना करावा लागतो. याकरिता पंतप्रधानांनी ड्रोन सारख्या उपकरणाचा वापर करण्याची शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे. खरच शंभर गावांमध्ये या द्रोण चे चाचणी करून शेतकऱ्यांना वापरासाठी उपलब्ध होणार आहे. कृषि क्षेत्रातील ड्रोनच्या वापराला गती देण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने ड्रोन फवारणीसाठी परवानगी दिली आहे.
या ४७७ नोंदणीकृत कीडनाशकांत कीटकनाशक, बुरशीनाशक आणि वनस्पती वाढ नियामाचा समावेश आहे. येत्या २ वर्षांत या कीडनाशकांचा ड्रोनच्या माध्यमातून व्यावसायिक वापर शक्य होणार आहे. ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या फवारण्यांमुळे रासायनिक कीडनाशकांचा, मानवी आरोग्यास हानिकारक खतांचा मानवांशी संपर्क येणार नाही. ४७७ कीडनाशकांना हंगामी स्वरूपाची परवानगी दिली आहे.
कृषी क्षेत्रासाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोन्समध्ये पोषक घटक, कीडनाशकांच्या फवारण्या, शेतीची पाहणी, माती आणि पीक परीक्षण अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. प्रत्येक कीडनाशकाला केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणी समितीची परवानगी घेणे बंधनकारक आहे. ही परवानगी १८ ते २४ महिन्यांच्या कालावधीत दिली जाते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम