शेतकऱ्यांने घेतले एक एकरात 30 टन टरबुजाचे उत्पन्न

0
23

शेतकरी शेवाळे हे सात वर्षांपासून टरबुजाचे पीक घेत आहेत. टेहरे येथील प्रयोगशील शेतकरी असून विजय शेवाळे यांनी एक एकर क्षेत्रात 30 टन टरबुजाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना एक आदर्श बनवला आहे. मागील दोन वर्षांत भरघोस उत्पादन हाती येऊनही कोरोनामुळे आर्थिक फटका बसला होता. यावर्षी मात्र त्यांना मोठ्या आशा वाटत आहेत.

पीक काढणी कार्यक्रमात कंपनी प्रतिनिधींनी उपस्थित शेतकर्‍यांना टरबूज पिकाच्या वाणाची निवड, लागवडीचा कालावधी, लागवड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, रोगावर कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणी कोणती करावी, याबाबत मार्गदर्शन केले. बाळासाहेब शेवाळे व त्यांचा मुलगा विजय यांनी 10 फेब्रुवारी रोजी सिंबा या वाणाच्या सात हजार रोपांची लागवड केली. गादीवाफे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनाचा वापर केला गेला. जमिनीची मशागतीपासून ते काढणीपर्यंत 50 हजार रुपयांचा खर्च पीक व्यवस्थापनावर झाला.

तर या कलिंगड उत्पादनातून कमीत कमी अडीच लाखांपेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा शेवाळे यांनी व्यक्त केली आहे. किमान दोन किलो ते जास्तीत जास्त सात किलो वजनाचे फळ तयार झाल्याने उत्पन्नात भरघोस वाढ झाली. गेल्या दोन महिन्यांपासून मालेगाव तालुक्यात 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमान असल्याने, उन्हाळ्यात शरीरासाठी अत्यंत पोषक असणार्‍या टरबूज खाणार्‍यांची संख्या वाढल्याने मागणीवर सकारात्मक परिणाम होऊन समाधानकारक पैसे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here