नाशिक प्रतिनिधी (भूषण चोभे) : कोरोनामुळे भीती आणि तणावाची स्थिती निर्माण झालेली
असताना, कोरोनाग्रस्तांचे समुपदेशन करून त्यांना आजारातून मुक्तीचा मार्ग दाखविण्याच्या शिवप्रसाद महाले यांनी केलेल्या कामाची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसतर्फे घेण्यात आले.
त्यासंबंधीचा सन्मान केंद्रीय आरोग्य
राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.महाले यांनी सर्वात प्रथम मालेगाव येथे पोलिसांचे मनोधैर्य उंचाविण्याचा उपक्रम राबविला. प्रशासनाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला होता. त्यानंतर मे २०२१ पासून पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील रुणांचे मनोधैर्य उंचाविण्यासाठी त्यांनी ‘रिचार्ज टू डिस्चार्ज’ हा उपक्रम सुरू केला.
अतिदक्षता विभागातील रुग्णांशी महाले हे संवाद साधत व त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशन
करणे, आवडीची गाणी वाजवून त्यांच्याकडून संगीतमय व्यायाम करून घेणे, ध्यान-धारणा करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले. उपक्रमामुळे रुग्णांमध्ये
सकारात्मक बदल दिसून आला. नामदार डॉ.भारती पवार यांनी शिवप्रसाद महाले यांच्या कामांची दखल घेत कौतुक केले.
त्यांना सन्मानित करण्याच्यावेळी भाजपचे जिल्हा सचिव सतीश मोरे, मधुकर गवळी, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम