नाशिकच्या सातपूर परिसरात गॅसचा स्फोट, महिलेचा होरपळून मृत्यू

0
28

नाशिक: नाशिकमध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. नाशकातील सातपूर परिसरात गॅस गळती होऊन भीषण स्फोट झाला आहे.यात अर्चना सिंग या महिलेचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान, गॅस सिलिंडरच्या स्फोटात एका तरुणीही भाजली आहे. जखमी मुलीला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मुलीवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या भीषण घटनेमध्ये घरातील सामानाचे ही बरेच नुकसान झाले आहे.

सदर घटना गॅस गळती झाल्याने घडली असावी, असा संशय या घटनेनंतर व्यक्त केला जातो आहे. त्यामुळे घरातील गॅसमधून गळती होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतू शकते, हे या घटनेमुळे आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचे स्फोट होण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे घरोघरी असणारा हा सिलिंडर आपल्या मृत्यूचं कारण ठरु नये, यासाठी खबरदारी घेतली पाहिजे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here