नाशिक पोलीस आयुक्तांची मुंबई बदली, पोलीस दलात उलथापालथ

0
43

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : राज्य सरकारने आज गृह विभागातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ज्यात नाशिकच्या पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली असून पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची मुंबई शहरात बदली झाली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक येथे राज ठाकरे यांच्या राजकारणाला चाप लावला होता.

नाशिक मध्ये ते वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमी चर्चेत होते. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळणे. तसेच हेल्मेट सक्ती, भोंग्यांवर मनाई आदेश, महसूल खात्यातील लेटर बॉम्ब, बॅनर परवानगी बंधनकारक, मिरवणूक परवानगी आवश्यक असे विविध आदेशानुसार कार्य दीपक पांडे यांनी आपल्या कारकिर्दीत केले होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी भोंग्यांचे डेसिबल मोजण्याचे आदेश काढून मनसेच्या भोंग्यांना ते लावण्या पूर्वीच चाप लावला होता.

नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे हे आता राज्यातील महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे पोलीस महानिरीक्षक असतील. वेशांतर करून गुन्हेगारीला आळा घालणारे पोलीस अधिकारी म्हणून त्यांचं नाव आघाडीवर आहे. तर जयंत नाईकनवरे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त करण्यात आले आहे. याशिवाय ११ पोलीस उपनिरीक्षक, २ पोलीस महानिरीक्षक, ६ पोलीस अधीक्षकांच्या बदल्या केल्याचे समोर आले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here