नाशिक प्रतिनिधी: गंगापूर गावातील दुधसागर धबधबा पाहण्यासाठी गेलेले तरुण नदीपात्रात बुडालेल्या ची घटना घडली. हे दोघे मित्र धबधबा पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते परंतु काही काळानंतर ते गोदावरी नदीपात्रात बुडाल्याची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन विभागाकडून शोधकार्य हाती घेण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीत गंगापूर धरणातून 600 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उन्हाळा सुरू झाल्याने अनेकजण नदीपात्रात अंघोळीसाठी गर्दी करत असतात.
गंगापूर येथील दुधसागर धबधबा बघण्यासाठी चार मित्र गेलेले होते. चौघांपैकी दोघे अंघोळीसाठी पाण्यात उतरले.पण, वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. यानंतर आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांनी या ठिकाणी मदतीसाठी धाव घेतली. अग्निशामन विभागाचे शोधकार्य सुरू आहे परंतू अजून कोणताच सुगावा लागलेला नाही
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम