नाशिक : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत येवला तालुक्यातील कोटमगावचे श्री जगदंबा देवस्थान, सिन्नर तालुक्यातील नांदूरिशगोटे येथील श्री रेणुका माता मंदिर, देवळा तालुक्यातील उमराणे येथील श्री रामेश्वर मंदिर, निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील श्री खंडेराव महाराज मंदिर, सुकेणे येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर देवस्थान तसेच पिंपळगाव बसवंत येथील श्री क्षेत्र श्रीराम मंदिर या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांसाठी शासनाकडून लवकरात लवकर अधिक निधी मिळवून या देवस्थानच्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी चांगल्या मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत
येवला तालुक्यात असलेल्या कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान मंदिर परिसरात भक्त निवास, सभामंडप, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, परिसर सुशोभीकरण यासह विविध विकासाची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यभरातून भाविक या ठिकाणी मोठय़ा संख्येने भेट देत असतात. या भाविकांना अधिकाधिक सुविधा प्राप्त व्हाव्यात , यासाठी या देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त व्हावा याकरिता पालकमंत्री भुजबळ यांचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. परिणामी, याठिकाणी भाविक अधिक मोठय़ा संख्येने येऊन पर्यटन व्यवसायात देखील वाढ होणार आहे. त्यामुळे परिसरातील अर्थकारणालादेखील अधिक गती मिळणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम