नाशिक शहरात पुन्हा खून ; कायद्याच्या धाक उरलाय का ?

0
57

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : नाशिक शहरात पुन्हा खून झाला आहे. गेल्या आठवड्यात देखील खून झाला होता. यामुळे सध्या शहरातील खुनाचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

अंबड परिसरातील कारगिल चौक परिसरात ही घटना घडली आहे. अंबड पोलीस हद्दीच्या दत्तनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सराईत गुन्हेगारासह तिघांनी खून केल्याची घटना घडली आहे . रात्री 9,30 च्या दरम्यान हा खून झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खून करून गुन्हेगार पसार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

राहुल गवळी वय 25 नाशिक असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलीस तपास करत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here