नाशिकमध्ये घडला चारचाकीचा भीषण अपघात. नाशिक शहरातील एबीबी सिग्नल येथे दोन चारचाकी आमने सामने आल्याने धडक झालीय. या धडकेतून दोन गाडयाचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत पाच वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.
नाशिक शहरातील एबीबी सिग्नलवर चौकाच्या मधोमध महिंद्रा झायलो आणि मारुती ब्रीझा या दोन कारचा अपघात झाला. मध्यरात्री 1 वाजता हा अपघात घडला असून या अपघातात पाच वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही गाड्यांमधील सात प्रवासी जखमी झाले. यामध्ये 4 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तात्काळ जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातात दोन्ही कारच मोठं नुकसान झालं आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्ण वाहिनी घटनास्थळी तात्काळ उपस्थित झाल्याने बचावकार्य सुरू केले. या अपघाताप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. गाड्यांच्या झालेल्या भीषण अपघातात दोन्ही गाड्या उलटल्या होऊन प्रवासी बाहेर फेकले गेले. जखमींच्या डोक्याला व हातापायांना जबर मार लागला असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम