कादवा कारखाना निवडणुकीत शेटे विजयी ; उर्वरित निकाल लवकरच

0
37

नाशिक प्रतिनिधी : जिल्ह्यातील कादवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सोसायटी गटातून श्रीराम शेटे (Shriram Shete) हे विजयी झाले असल्याची माहिती नुकतीच हाती आली आहे.

मोठ्या चुरशीच्या लढतीत कादवा विकास पॅनलचे नेते श्रीराम शेटे याना २६ मते मिळवत मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांनी परिवर्तन पॅनलचे संपतराव वक्ते यांना फक्त ९ मते पडले असून त्यांचा दारुण पराभव झाला आहे.

याठिकाणी शेटे यांच्या विजयामुळे कादवा विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत विजयोत्सव सुरू केला आहे. उर्वरित पाच गटांची मोजणी सुरू असून लवकरच निकाल हाती आपल्यापर्यंत पोहचवले जाणार.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here