द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत असलेल्या एलाईट डिझाइन इन्स्टिट्यूटच्या नाशिक येथील नुतन वास्तूचे नुकतेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
एलाईट डिझाइन इन्स्टिट्यूट ही संस्था गेल्या चार वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात वाखाणण्याजोगे कार्य करत आली आहे. संस्थेचे संचालक किरण रत्नाकर कातोरे आणि राजश्री किरण कातोरे या आपल्या संस्थेद्वारे सदोदित शैक्षणिक क्षेत्रात उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत आले आहेत.
त्यांच्या याच कार्याची पावती म्हणून एलाईट डिझाइन इन्स्टिट्यूटच्या नुतन वास्तू शुभारंभासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, हिरामण खोसकर, जि. प. सदस्य गोरख बोडके, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी उपस्थित होते. एलाईट डिझाइन इन्स्टिट्यूटच्या पुढील वाटचालीसाठी याप्रसंगी सर्व प्रमुख अतिथींनी शुभेच्छा दिल्या.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम