द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक शहर पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी स्वतः बदलीसाठी अर्ज केला असल्याचे सांगण्यात येत आहे. वैयक्तिक कारणातून त्यांनी हा अर्ज केला आहे. अचानकपणे पोलीस आयुक्तांद्वारे करण्यात आलेल्या या अर्जाने वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या होत्या.
आपल्या वैयक्तिक कारणास्तव आपण पोलीस महासंचालकांकडे अकार्यकारी पदावर नेमणूक देण्याबाबत अर्ज केलेला आहे. यात कोणत्याही प्रकारचे इतर कारण नाही. असे पोलीस आयुक्तांनी एका माध्यमांशी बोलतांना सांगितले.
यामुळे आता पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या अर्जावर आता काय निर्णय होतो, त्यांच्या नंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम