द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक येथे महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दोघा महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. गंगापूर रोडवरील महिला सुरक्षा विभागात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर रोड येथील महिला सुरक्षा विभागात समुपदेशन सुरू होते. यावेळी सिडकोमधील त्रिमूर्ती चौक भागात राहणाऱ्या प्राजक्ता नागरगोजे आणि सरला बोडके यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आणि नंतर मारहाण केली. याबाबत सुरक्षा विभागात कार्यरत असणाऱ्या ज्योती तुकाराम आमने यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सरकारवाडा पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
गंगापूर रोड येथील या महिला सुरक्षा विभागात महिलांना आवश्यक असे समुपदेशन केले जाते. मात्र या विभागातच हा प्रकार घडल्याने आता याबाबत अधिक तपास केला जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम