पिंपळगाव टोलनाका प्रसासनास आमदार बनकरांनी धरले धारेवर

0
44

मुकुंद भडांगे ,पिंपळगाव प्रतिनिधी : कधी कर्मचाऱ्यांची अरेरावी तर कधी अवाजवी टोल आकारणी यामुळे सतत वादात असलेल्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्याच्या वारंवार विविध प्रकारच्या तक्रारी आमदार दिलीपराव बनकर यांना प्राप्त झाल्याने आमदार बनकर यांनी प्रत्यक्ष टोलनाक्यावर जाउन टोलनाका प्रसासनाला चांगलेच धारेवर धरले . या आंदोलनादरम्यान एक तास टोल खुला करण्यात आला होता.

पिंपळगांव बाजार समिती कार्यशक्षेत्रात टोमँटो हंगामाने वेग मोठ्या प्रमाणात वेग घेतला आहे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या पिंपळगाव बाजार समितीत निफाड तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी आपली वाहने घेऊन येतात. जिल्ह्यातील व स्थानिक शेतकऱ्यांना या टोलनाक्यावर मोठया प्रमाणात अडवणूक होते ,तसेच खूप वेळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो ,त्यामुळेच शेतकऱ्यांना बाजार समितीत पोहचण्यास उशीर होतो हा उशीर होऊ नाही म्हणून शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन ठेवण्याच्या सूचना आमदार बनकर यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या.
तसेच कायमच कर्मचाऱ्यांच्या आरेरावी मुळे या टोलनाक्यावर वाद होत असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनि टोलवर येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दयावी अशी सूचना देण्यात आल्या .

नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बाहेरील पासिंगच्या वाहनांना लोकल टोल आकारला जात नाही संबंधित शेतकऱ्यांचे ओळखपत्र तपासून त्या शेतकऱ्यांला टोल माफी देण्यात यावी अश्या विविध सूचना देत आमदार दिलीपराव बनकर यांनी टोलनाका प्रसाशनाला चांगलेच धारेवर धरले.

पुन्हा शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या तक्रारी आल्यास टोलनाका बंद करण्याच्या इशारा आमदार बनकर यांनी दिला


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here