द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक शहरात एका बंद गाळ्यात मानवी शरीराचे अवयव सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई नाका येथील एका बंद असलेल्या गाळ्यात हे अवयव आढळून आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई नाका पोलीस ठाण्याजवळ एका गाळ्यात कुजका वास येऊ लागला होता. नंतर तपास केला असता, इथल्या एका बंद असलेल्या गाळ्यात मानवी शरीराचा कान, मेंदू, डोळे, चेहऱ्याचा भाग असे रासायनिक द्रव्यात ठेवलेले आढळून आले.
याबाबत पोलिसांनी गाळा मालकास विचारणा केली असता, हा गाळा 15 वर्षांपासून बंद होता. तसेच तो वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी वापरत होते. अशी माहिती मिळाली. यावरून हे अवयव वैद्यकीय वापरासाठी वापरले गेल्याचा अंदाज पोलिसांनी लावला.
दरम्यान, या परिसरात वाहनांच्या बॅटऱ्या चोरीच्या बऱ्याच घटना घडलेल्या असल्याने, त्या बॅटऱ्या इथे या गाळ्यात मिळतात का, हे शोधत असतांना पोलिसांना हे मानवी अवयव आढळून आले.
हे अवयव ज्या पद्धतीने ठेवलेले होते. त्यावरून ते वैद्यकीय अभ्यासासाठीच वापरले गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम