नाशिक प्रतिनिधी : शेतकरी संकटात सापडला असून दिंडोरी तालुक्यात एक तरुण शेतकऱ्याने बँकेच्या कर्जाला कंटाळत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून प्रशासनाच्या धोरणांविरोधात संताप व्यक्त केला जातं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे येथील संदीप राजेंद्र भुसाळ या तरुण शेतकऱ्याने एका बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र नापिकीमुळे त्याने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे.
हा युवक घेतलेलं कर्ज फेडणे अशक्य होऊ लागल्याने नजीकच्या काळात बँकेचा तगादा लागू शकतो. ते आपण फेडू शकत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या तरुण शेतकऱ्याने याबाबतची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर प्रसिद्ध करून आत्महत्या केली. यात त्याने कोणीही दोषी नसल्याचे नमूद केले आहे. या घटना थांबण्यासाठी पाऊले उचलणे गरजेचं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम