द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकारी वर्गाला कार्यालयात उशिरा येणे चांगलेच भोवले आहे. आता याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व अधिकाऱ्यांना देखील वेळेवर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक जिल्हा परिषद कार्यालयात बायोमेट्रिक सिस्टीम सुरू करण्यात आल्यावर, आपल्या मनमर्जीनुसार कार्यालयात येणाऱ्या अधिकाऱ्यांना लीना बनसोड यांनी चांगलेच फैलावर घेतले.
दरम्यान, नाशिक जिल्हा परिषद कार्यालयात आता प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वांना कार्यालयात सकाळी पावणे दहाच्या आत हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र बनसोड यांनी बोलावलेल्या खाते प्रमुखांच्या बैठकीस बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता कंकरेज, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे मात्र उशिराने कार्यालयात हजर झाले. यामुळे लीना बनसोड यांना अधिकाऱ्यांना फैलावर घेत, सर्वांनी वेळेचे बंधन पाळण्याच्या सूचना केल्या.
आता नाशिक जिल्हा परिषदेत अधिकारी वर्गासही बायोमेट्रिक सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने, अधिकाऱ्यांना देखील वेळेचे बंधन पाळावे लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम