नाशिक प्रतिनिधी : बूथ रचणे सोबतच नियमित बूथ बैठकांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील , विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस व प्रदेश सरचिटणीस श्रीकांतजी भारतीय यांनी प्रदेश पदाधिकारी , मंत्री , खासदार,आमदार जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी व बूथ प्रमुख व लोकप्रतिनिधीना केले असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र संघटन महामंत्री रविजि अनासपुरे व भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी दिली .
बूथ निहाय बैठका २० मार्च पर्यंत घेणे अपेक्षित होते परंतु ज्या बूथ बैठका अद्याप झाल्या नसतील त्या लवकरात लवकर घेऊन तसा अवहाल सादर करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती ही या वेळी भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी दिली.
आहेर पुढे म्हटले आहे की, नुकत्याच चार राज्यात भाजपला मिळालेले घवघवीत यशाचे श्रेय बूथ बैठका, बुथ मधील पेज प्रमुखांनी प्रत्येक घरात जाऊन केलेला मतदार संपर्क , नवमतदार नोंदणी, यादी तपासणी, आणि योजना लाभार्थी जागर यांना दिले आहे.
या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, मोर्चा प्रकोष्ट आघाडी प्रमुख यांनी प्रत्येकाने एका बूथ , शक्ती केंद्र प्रमुखाची जबाबदारी घेतलीच असेल व नसेल घेतली तर ती लवकरात लवकर घ्यावी असे आवाहनही या वेळी करण्यात आले आहे.
बूथ रचना निहाय, शक्ती केंद्र निहाय तसेच मंडल निहाय व्हाट्सअप्प ग्रूप च्या रचना कराव्यात व हे ग्रुप कार्यरत असण्यासाठी सतर्क राहावे बूथ कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरातील जास्तीत जास्त नावे व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जोडावीत रविवार दिनांक २७ मार्च रोजी मनकी बात या कार्यक्रमाचे ठिकाण निश्चित करावे व या ठिकाणी मन की बात या कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना कसा मिळेल या साठी मंडल तसेच बूथ रचनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत मोठया संख्येने बूथ रचनेतील पदाधिकारी , परिसरातील भाजप कार्यकर्ते , पदाधिकारी मंडल पदाधिकारी शहर पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी नमो अँप डाउन लोड केलेच असेन परंतू आत्तापर्यंत ज्यांनी नमो अँप डाउन लोड केले नसेल त्यांनी त्वरित डाउन लोड करावे असे आवहानही विभागीय संघटन मंत्री रवीजी अनासपुरे व भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मजबूत करण्यासाठी देणगी स्वरूप अल्प योगदान नमो अँप च्या माध्यमातून करावे असे आवाहनही शेवटी करण्यात आले आहे.
अधिक माहिती देताना पुढे म्हणाले की नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या निवडणूका जवळ येऊन ठेपल्या आहेत या साठी शत प्रतिशत भाजप ची सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी व बूथ रचना पदाधिकाऱ्यांनी आता थांबायचे नाही तर जोमाने कामाला लागावे असे म्हटले आहे. प्राप्त माहितीनुसार विभागीय संघटन मंत्री रवीजी अनासपुरे यांनी जिल्हा निहाय व मंडल निहाय बैठकांचा धुमधडाका लावला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम