त्र्यंबकेश्वर : धुळवड खेळण्यासाठी धरणावर गेलेल्या महिलेचा कश्यपी धरणात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडल्याने होळीच्या आनंदावर दुखाचे सावट निर्माण झाले आहे.याबाबत समजलेली हकीकत अशी आहे की नाशिकरोड येथील योगिता राजेश कांबे वय 30 हि महिला गिरनारे जवळच्या कश्यपी धरणावर धुळवड साजरी करण्यासाठी गेली होती.तीच्या सोबत आणखी एक महिला आणि दोन पुरूष व्यक्ती देखील होत्या.
या चारही व्यक्ती धुळवडीचा रंग धुण्यासाठी म्हणून पाण्यात उतरले असता योगीताला खोलीचा अंदाज आला नाही आणि ती पाण्यता घसरून पडली दरम्यान तीला वाचविण्यासाठी सोबतच्या साथीदारांनी प्रयत्न केले मात्र कोणालाही पोहता येत नव्हते.त्यांनी आरडाओरड करत आजुबाजुला असलेल्या माणसांना जमा केले.मात्र महिला पाण्यात नेमकी कोठे असेल याचा अंदाज येत नसल्याने सातपुर अग्नीशमन दलास दुरध्वनीवरून कळविण्यात आले.त्यांना माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे कर्मचारी आर.सी.मोरे,एस.एम.जाधव,
एस.आर पगार,सी.एस.उन्हाळे,व्ही.एस.वावडे यांच्या पथकाने बोटीतून जाऊन गळाच्या सहायाने मयत महिलेचा मृतदेह बाहेर काढला.हरसुल पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्युची नांद करण्यात आली आहे. निरगुडपाडा येथे दोघांचा अपघाती मृत्यु हरसुल जवळच असलेल्या निरगुडपाडा येथे दुचाकीचा अपघात होऊन दोन युवकांचा जागच मृत्यु घडल्याची दुर्दैवी घटना होळीच्या रात्रीस घडली आहे.याबाबत अपघाताची नोंद झाली आहे. दरम्यान मयतांची नावे समजु शकलेली नाही ते हरसुल परिसरातील स्थानिक रहिवासी आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम