धुळवडीच्या दिवशीच नाशकात दुःखद घटना; कश्यपी धरणावर महिलेचा बुडून मृत्यू

0
24

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : नाशकात रंगपंचमी आणि होळीच्या उत्सवावरील निर्बंध हटवण्यात आल्याच्या जल्लोषात सारे असताना, एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. कश्यपी धरणावर एका महिलेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नाशिक शहराजवळील कश्यपी धरण आणि गंगापूर डॅम या धरणांवर नेहमीच पर्यटकांची गर्दी होत असते. त्यात धुळवड, रंगपंचमीच्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करत असतात. असेच काही महिला आणि पुरुष गिरणारे गावाजवळील कश्यपी धरणावर गेले असता, एका महिलेचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, काही तासांच्या प्रयत्नानंतर संबंधित महिलेचे शव बाहेर काढण्यात अग्निशमन विभाग आणि पोलिसांना यश आले. ऐन सणाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here